ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

हवामान अंदाज

जाणून घ्या आपल्या गावाचे हवामान

ग्रामपंचायत शिरूर ताजबंद यांच्याकडून यांच्याकडून आपणास विनंती पूर्वक कळविण्यात येते की पुढील चार दिवस हवामान खात्याने पावसाचा जोर मराठवाड्यात जास्त राहील असे वर्तविले आहे तरी आपण सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची व जनावरांची काळजी घ्यावी एखाद्या वेळेस अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी यांना ग्रामपंचायतला त्वरित कळवावे.
1)एखादा नाला जास्त वाहत असताना जनावरे किंवा आपण ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.
2)खूप जुन्या घरामध्ये कृपया करून पाऊस असेपर्यंत कोणीही वास्तव्य करू नये पर्यायी पक्या घरात राहावे.
3) एखाद्या कुटुंबाच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले आणि त्याला राहण्यासाठी सध्या पावसात पर्याय नसेल अशा कुटुंबासाठी ग्रामपंचायत कडून त्यांना तात्पुरत्या निवासासाठी सार्वजनिक सभागृह, शाळेची खोली, अंगणवाडी खोली आपण पर्यायी व्यवस्था म्हणून निवासासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सोयीचे केलेले आहे.
तरी सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती.

ग्रामपंचायत शिरूर ताजबंद

26/09/2025

एखादा वेळी व्यक्ती पाण्यात अडकला असेल त्याला मदत कार्य किंवा काढण्यासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायत कडे उपलब्ध आहे.त्या प्राथमिक बचाव साहित्य छोटी बोट, व्यक्ती पाण्यात बुडू नये म्हणून जॅकेट साहित्य आहे गरज पडल्यास त्वरित ग्रामपंचायतला संपर्क साधावा ही विनंती.